जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा

फलटण, दि. 9 (प्रतिनिधी)- सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात मोठ्या  प्रमाणात साजरा करण्यात आला.  मुख्य कार्यक्रम फलटण येथील त्यांच्या  निवासस्थानी सकाळी ११वा सुरू झाला. यावेळी  हिंगनगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य धैर्यशील अनपट यांच्या वतीने २० मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले.  शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील आजी माजी सदस्य,पंचायत समिती,  सभापती यांच्यासह अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.