कौशिक प्रकाशनच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

 सातारा, दि. 28 –  येथील जेष्ठ करसल्लागार व साहित्यिक अरुण गोडबोले यांनी लिहिलेल्या ..गुंतवणूक मार्गदर्शिका आणि नोंदवही.. या पुस्तकाचे  तसेच या पुस्तकाच इंग्रजी रुपांतर असणा-या  पुस्तकाचा प्रकाशन समारंभ येत्या रविवारी 3 एप्रिल रोजी होत आहे.

कौशिक प्रकाशनच्यावतीने या दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन सोहळयात एन.एस. डी.एल. चे वरीष्ठ उपाध्यक्ष सुप्रसिध्द अर्थतज्ञ, व्याख्याते आणि लेखक चंद्रशेखर टिळक यांच्याहस्ते आणि किर्लोस्कर वाडी येथील साप्ताहिक आपले जग चे संपादक वसंत आपटे यांच्या अध्क्षतेखाली होत आहे.  नगरवाचनालातील पाठक हॉलमध्ये आयोजीत केलेल्या या कार्यक्रमात सांयकाळी 6 वाजता पुस्तक प्रकाशनानंतर चंद्रशेखर टिळक यांचे गुंतवणूक कशी करावी या विषयावर मार्गदर्शनही करणारे आहेत. या कार्यक्रमास सातारकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अरुण गोडबोले यांनी केले आहे.