स्थानिक संस्था ताब्यात घ्या, नंतरच पेढे स्वीकारणार – देवेंद्र फडणवीस

सातारा, दि.7-  सातारा नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघ ताब्यात घ्या, त्यानंतरच मी पेढे स्वीकारीन असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, निवडणूकांसाठी लागेल ती रसद भाजपाकडून दिली जाईल असे सांगून अत्यंत संघर्षातून राजकारणात टिकून राहिलेल्या संतोषभाऊ जाधव यांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभे राहिल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंदीय नितीन गडकरी, भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा गिरीश बापट, माजी मंत्री एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, कांताताई नलवडे, अतुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, एखादय़ा पक्षात प्रवेश केल्यानंतर संतोषभाऊसारख्या तरूण, तडफदार युवा नेता कोरेगाव विधानसभा मतदार स्घांतील आठ जागा निवडून आणूनही त्याला संघर्षमय राजकारण करावे लागते. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सातारा-कोरेगाव मतदार संघातील प्रस्थापितांना चारीमुंडय़ा चित करून आजही युवकांचा आयडॉल म्हणून परिचित असणाऱया संतोषभाऊ जाधव यांनी सातारा नगरपालिका, सातारा पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घ्यावेत, त्यासाठी लागेल ती रसद, ताकद संतोषभाऊ जाधव यांना दिली जाईल. भाजपाला आक्रमक आणि युवा चेहऱयाची गरज होती. आज ती संतोषभाऊ यांच्या रूपाने पूर्ण झाली आहे. आज पक्षप्रवेश झाला आहे. आजपासूनच कामाला लागा. स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेतल्यानंतरच मी स्वतः पेढे खाण्यासाठी सातारला येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कांताताई नलवडे म्हणाल्या, संतोषभाऊ जाधव शिवसेनेमध्ये असताना 8 फेबुवारी 2009 साली सातारा येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची सभा झाली. त्या सभेला 20 हजार लोकांची फौज घेवून संतोषभाऊ जाधव उपस्थित झाले होते. मात्र, त्याची दखल शिवसेनेला घेता आली नाही. तालीम संघावर झालेली उध्दव ठाकरे यांची सभा हाणून पाडण्याचा प्रयत्न पक्षांतर्गतच झाला होता. मात्र तो प्रयत्न संतोषभाऊंनी हाणून पाडत सभा यशस्वी केली. दुर्देवाने संतोषभाऊंसारख्या युवा चेहऱयाचा लाभ कोणत्याही पक्षाला घेता आला नाही. संतोषभाऊ आज भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा, काम करण्याच्या पध्दतीचा, त्यांच्या पाठीमागे असलेल्या युवा शक्तीचा भाजपाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यादृष्टीनेच भविष्यकाळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. ाgख्यमंत्री लवकरच क्षेत्रमाहुलीत

न्यायमूर्ती रामशात्री प्रभुणे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्षेत्रमाहुली ता. सातारा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्याचे निमंत्रण आपण स्वीकारले असून त्यासाठी लवकरच क्षेत्रमाहुलीला भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, संतोषभाऊ यांच्या पक्षप्रवेशानंतर आमदार नरेंद्र पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हाअध्यक्ष विक्रम पावसकर, भारत पाटील, दत्ताजी थोरात, विजय काटवटे, विठठ्ल बरकडे यांनी दूरध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले.