मायणी येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतमाता ज्युनिअर कॉलेज तर्फे स्वच्छता मोहीम

मायणी, दि. 10(प्रतिनिधी)-  संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असलेल्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात साजऱ्या करण्यात येत असलेल्या स्वच्छता सप्ताहात मायणी येथील भारतमाता ज्युनिअर कॉलेज मायणीच्या सर्व विदयार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी कॉलेज परिसर, मुख्य पेठ, बस स्थानक परिसरात मोठ्या उत्साहाने स्वछता करून परिसरातील संपूर्ण प्लास्टिक वस्तू,कचरा उचलून परिसर स्वछ केला.
यावेळी बोलताना कॉलेजचे उपप्राचार्य श्री.पिसाळ म्हणाले , आपल्या राहत्या घराचा परिसर आपण दररोज स्वच्छ करतोच परंतु सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करणे हे हि आपले परम कर्तव्य आहे. सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या स्वच्छते मुळे गावात कोणतेही रोगराई पसरणार नाही . त्यामळे आपले गाव आणि आपल्या गावातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहील. या स्वच्छता मोहीमेच्या निमित्ताने या ठिकणी कॉलेजचे प्राचार्या इनामदार ,सर्व शिक्षक वर्ग ,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.