राजेश जाधव यांची अन्याय विरोधक सेवा समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड

मायणी, दि. 10 (प्रतिनिधी)-  समाजातील सामान्य घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे  काम समितीच्या माध्यमातून आम्ही करणार असून समाज्यातील विकृत  प्रव्रुत्ती असणाऱ्या लोकांचा बिमोड करण्यासाठी आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम अन्याय विरोधक सेवा समिती करणार असल्याचे मत समितीचे नूतन महाराष्ट्र अध्यक्ष राजेश जाधव यांनी केले. ते समितीच्या मुंबईं येथे आयोजित अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष  संतोष(भाऊ) वाडकर ,पश्चिम महाराष्ट्र सचिव कुमार शितोळे यांचे सह सर्व पदाधिकारी ,मान्यवर उपस्थित होते.

विटा ता खानापूर येथील कर्मभूमी असणारे राजेश जाधव यांनी आज वर विविध वृत्तपत्रे ,साप्ताहिक या साठी काम केले असून, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची जनसामान्यांच्यात वेगळी प्रतिमा आहे . दै ऐक्यचे अभ्यासू पत्रकार अशी आजही ओळख असणारे कै. दत्तात्रेय जाधव यांचे सुपुत्र असणारे श्री राजेश जाधव हे श्री साईनाथ सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत.   अन्याय विरोधक सेवा समितीचे यापुढे महाराष्ट्रातील जिल्हे, तालुका प्रमुखांची निवड करण्यात येणार असून येत्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात कण्याचे समितीची कार्यकारणी स्थापन करणार असल्याची माहिती ,नूतन अध्यक्ष राजेश जाधव यांनी दिली .  कोणत्याही सामाजिक प्रश्नासंबंधी ,प्रशासकीय कामात होणारी सर्वसामान्यांची अडवणूक या संदर्भात ९०३७१८०१३० या आपल्या मोबाइल नंबर वर संपर्क थेट संपर्क साधावा असे आवाहन राजेश जाधव यांनी केले आहे