गोंदवले खुर्द येथील कोल्हापूर बंधा-याच्या दुरुस्तीची मागणी

गोंदवले, दि. 29 –  गोंदवले खुर्द ता माण येथील माण नदीवर असणा-या कोल्हापुर पद्धतीच्या बंधा-याचा पाया मोठ्या प्रमाणात खचला असुन त्यातील दगड निघुन गेल्याने बंधा-याला धोका निर्माण झाला असुन संबंधित खात्याने त्वरीत लक्ष देवुन त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थानी केलेली आहे .

माण नदी पात्रात सुमारे गेल्या पंधरा वर्षापुर्वी महारष्ट्र शासन अंगीकृत जिहे  कठापुर उपसा जल सिंचन कुकडी पाटबंधारे  प्रकल्पान्तर्गत  सुमारे पस्तीस लाख रुपये खर्च करुन  कोल्हापुर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला.माण नदीचे या ठिकाणी असणारे पात्र पुर्णता खडकाळ आहे त्याच ठिकाणी अगोदर पाया काढणे साठी संबंधीत ठेकेदाराने नदीतील खडकात  जेसीबी पोकलॅन ला पाया निघत नसल्याने त्यानी  त्यासाठी ब्रोकर मशीनचा वापर करणे गरजेचे असताना सुद्धा ठेकेदाराने तशी मशीन न वापरता थेट जिलेटीन द्वारे दहा फूटी होल घेवुन पाया काढण्याच्या तिथे स्फोट केले त्यामुळे सर्व खडक हादरले खडकाना छिद्रे भेगा मोठ्या प्रमाणात पडल्या व अशा परिस्तितीच  पाया काढला.पाया नंतर त्याच्यावर बांधकाम केले गेले सुमारे एकवीस दरवाजे आणि खिडक्या याठिकाणी आहेत.संपुर्ण बंधारा पुर्ण झाल्यावर माण नदीला  पावसाळ्याच्या दिवसात अचानक पुर आला या नंतर आलेल्या  पहिल्या पाण्याने साठा झाला पण खडक हादरल्याने ते पाणी साठुन न राहता बंधा-याच्या दरवाजात न आडता हादरलेल्या खडकातुन निघुन गेले. परिणामी बंधारा कोरडाठणठणीत  पडला त्यानंतर संबंधीत ठिकाणच्या शेतक-यांनी  पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली.त्यानुसार ठेकेदाराने येवुन पाहण्याच नाटक केल आणि परत परिस्थीती जैसे थे राहिली.एवढा मोठा बंधारा असुन सुद्धा पाणी आल्यावर जास्त दिवस पाणी साठुन राहत नाही. प्रत्येक वेळी दिवाळी नंतर नोव्हेंबर महिन्यात या ठिकाणच्या लोखंडी फळ्या दरवाजात टाकुन ते पॅक करावे लागतात पण पृष्टभागातील खडकच हादरल्याने काही ही केल्या तरी म्हणावा असा उपयोग होत नाही.दरम्यान हि समस्या असताना बंधा-याचा पाया उत्तर बाजुच्या दिशेने खचु लागला उत्तर बाजुने सुमारे तीस फुट लांब आणि तीन फुट उंच असे खडक निघुन गेल्याने बंधा-याचे  नुकसान झाले आहे यामुळे त्या ठिकाणच्या लाभ क्षेत्रातील लोकाना या बंधार्याचा अजिबात उपयोग होत नाही परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्या ऐवजी घटु लागलेली आहे .त्यामुळे याठिकानच्या बंधा-याची दुरुस्ती तात्काळ होणे गरजेचे आहे.