कोल्हापूर विभागीय शालेय नेटबॉल स्पर्धेत भारतमाता विद्यालय, ज्युनिअर कॉलेज,वत्सल्याबाई कन्या प्रशाला चे वर्चस्व

मायणी, दि.10 (प्रतिनिधी)-  नुकत्याच भारतमाता विद्यालय येथे विभागीय नेटबाँल स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत भारतमाता विद्यालय ,भारतमाता ज्युनिअर कॉलेज व वत्सल्याबाई कन्या प्रशाला मायणीच्या अनुक्रमे १४वर्षे व१९वर्षे वयोगटातील मुले,आणि १७ वर्षे वयोगटातील मुली यांच्या संघाने  स्पर्धेत आपले वर्चस्व गाजवत तीनही गटात विजय संपादन केला.या तीनही विजयी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून राज्यस्तरीय स्पर्धा १२ ते १५ ऑक्टोबर रोजी अमरावती पार पडणार आहे.
विजयी संघाच्या सर्व खेळाडूंचे भारतमाता शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेंद्र गुदगे ,संस्थेचे संस्थापक सचिव सुधाकर कुबेर, प्राचार्य.पी आर इनामदार,उपप्राचार्य.पिसाळ , नेटबाँल जिल्हा सचिव काळे ,राजेंद्र पवार ,गोडसे, गफार पठाण यांनी अभिनंदन केले व आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विजयी संघास प्रशिक्षक श्रीमंत कोकरे,प्रशांत सुतार, गणेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.