8 वर्षापूर्वी मुलीच्या बापानं लग्नास नकार दिला म्हणून तरूणानं केला खून

8 वर्षापूर्वी मुलीच्या बापानं लग्नास नकार दिला म्हणून तरूणानं केला खून

रत्नागिरी - नातेसंबंध, प्रेमसंबंधांमध्ये अपयश आणि त्यानंतर खून, जीवघेणा हल्ला या घटना काही आता नवीन नाहीत. प्रेमात आलेला नकार किंवा आलेलं अपयश यानंतर असे अनेक प्रकार घडत आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील कोंडगावात देखील अशीच घटना घडली आहे. 8 वर्षापूर्वी मुलीच्या बापानं लग्नास नकार दिला. त्यानंतर मनात राग असलेल्या तरूणानं 8 वर्षानंतर मुलीच्या बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

14 ऑगस्टच्या रात्री आरोपी अभिजीत पाटील हा सुभाष काळोखे यांच्या घरी गेला. यावेळी सुभाष काळोखे एकटे असल्याचं पाहत अभिजीतनं त्यांच्या डोक्यात दगडी जात्या घालत त्यांचा खून केला. त्यानंतर घटना स्थळावरून आरोपी अभिजीत पाटील हा पसार झाला. सुभाष रामचंद्र काळोखे वय वर्षे 73 असं मृत व्यक्तिचं नाव असून या प्रकरणी देवरूख पोलिसांनी अभिजीत पाटील या आरोपीला अटक केली आहे. सध्या या साऱ्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपी अभिजीत हा रत्नागिरी जवळच्या नाचणे गावात राहत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.