कोरोना संसर्गानंतर शरीरातील विषाणूच्या संख्येत होणारी वाढ रोखू शकेल

कोरोना संसर्गानंतर शरीरातील विषाणूच्या संख्येत होणारी वाढ रोखू शकेल

वॉशिंग्टन – संसर्गानंतर शरीरातील कोरोना विषाणूच्या संख्येत होणारी वाढ रोखू शकेल, अशा औषधाचा शोध अमेरिकन संशोधकांनी लावला आहे. हे औषध आधीपासूनच अस्तित्वात असून, आता त्याचा उपयोग कोरोनावर उपचार करण्यासाठी केला जाईल. या औषधाचे ॲब्सेलेन असे नाव असून याचा उपयोग बायपोलर डिसऑर्डर आणि ऐकण्याची क्षमता घटण्याच्या उपचारात केला जातो.

या औषधावर नवीन संशोधन अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने केले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या औषधामुळे शरीरात कोरोना विषाणूंची संख्या वाढवणाऱ्या एंजाइमांवर नियंत्रण ठेवता येते. सायन्स अ‍ॅडव्हान्सस या जर्नलमधील प्रसिद्ध संशोधन अहवालानुसार, कोरोना व्हायरसला रिप्लीकेट (व्हायरसची संख्या वाढणे) होण्यापासून रोखण्यात एम-प्रो नावाचे एंजाइम अत्यंत उपयुक्त आहे. हाच आरएमए कोरोनाचा स्पाइक प्रोटीन बनवते. कोरोना एम-प्रो एंजाइमच्या मदतीने शरीरात संख्या वाढवते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होते. आता संशोधक याच एंजाइमला नियंत्रित करून उपचार करणार आहेत.