१५ जूनच्या रात्री शहीद झालेल्या २० भारतीय जवानांची नावे राजधानीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार

१५ जूनच्या रात्री शहीद झालेल्या २० भारतीय जवानांची नावे राजधानीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जूनला चिनी फौजांशी शौर्याने लढताना शहीद झालेल्या २० भारतीय जवानांची नावे राजधानीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार आहेत. यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. 

भारत व चीन यांच्या फौजांमध्ये १५ जूनच्या रात्री गेल्या पाच दशकांतील सर्वात भीषण संघर्ष झाला होता. चीनतर्फे गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट १४च्या परिसरात टेहळणी चौकीच्या उभारणीला भारतीय सैनिकांनी विरोध केल्यानंतर, चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठय़ा, लोखंडी कांबी वापरून त्यांच्यावर भीषण हल्ले केले होते. या घटनेमुळे पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव मोठय़ा प्रमाणात वाढला. भारताने याचे वर्णन ‘चीनची पूर्वनियोजित कृती’ असे केले होते.