हार्दिक-नताशा यांना पुत्ररत्न झाले

हार्दिक-नताशा  यांना पुत्ररत्न झाले

भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आज हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा खूप गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांना ही गोड बातमी सांगितली.