स्वरा भास्कर नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे

स्वरा भास्कर नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडणारी अभिनेत्री स्वरा भास्कर आता एक नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी सीरिजचं नाव ‘फ्लेश’ असं आहे. ही एक क्राईम मिस्ट्री प्रकारातील सीरिज आहे. या सीरिजचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.

‘फ्लेश’ या सीरिजची कथा रोजगाराच्या नावाखाली होणाऱ्या मानवी तस्करीवर आधारित आहे. एका तरुणीचं अपहरण केलं जातं. या तरुणीची केस राधा नौटियाल नावाच्या एका स्री पोलीस अधिकाऱ्याच्या हातात येते. राधा नौटियाल ही व्यक्तिरेखा स्वरा भास्करने साकारली आहे. या तरुणीला शोधण्यासाठी राधाने केलेले प्रयत्न या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहेत. स्वरा भास्कर व्यतिरिक्त अक्षय ओबेरॉय, युधिष्टीर, विद्या माळवदे, महिमा मकवाना यांसारखे अनेक दमदार कलाकार या सीरिजमध्ये झळकणार आहेत. ही सीरीज येत्या २१ ऑगस्टला इरोस नाऊ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.