सावधानता: जाणून घ्या जग कुठल्या अटीसंह पर्यटकांसाठी पुन्हा सुरू होत आहे

सावधानता: जाणून घ्या जग कुठल्या अटीसंह पर्यटकांसाठी पुन्हा सुरू होत आहे

अलीकडेच ३५ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे पूर्णपणे सुरू करण्यात आली आहेत. दुसरीकडे बरेच देश काही अटी व सावधगिरीने पर्यटन सुरू करत आहेत. चला, अशा काही देशांबद्दल जाणून घेऊ-
फ्रान्स : आयफेल टॉवरचा वरचा मजलाही उघडला
फ्रान्स पुन्हा एकदा कोरोना कालावधीत पर्यटकांसाठी उघडत आहे. परंतु काही विशिष्ट अटींसह फ्रान्समध्ये येणाºया सर्व पर्यटकांना आता १४ दिवस क्वॉरंटाइन राहणे आवश्यक आहे. यातून केवळ युरोपियन युनियन आणि यूके नागरिकांना सूट देण्यात आली आहे. पॅरिसमधील डिस्नेलँड हे युरोपमधील सर्वात प्रसिद्ध थीम पार्क आहे. हे चार महिन्यांनंतर उघडण्यात आले आहे. आयफेल टॉवरचे पहिले दोन मजले २६ जूनला उघडले गेले होते. परंतु त्याचा वरचा मजलाही उघडण्यात आला आहे. केवळ २५० लोक जाऊ शकतात.
यूएई : २४ तासांच्या अंतरानंतर पुढील गेस्टला खोली मिळेल
७ जुलैपासून दुबई देश आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी खुले करण्यात आला. प्रवासाच्या तारखेपासून ४ दिवसांच्या आत घेतलेल्या कोविड -१९ चाचणीचा अहवाल पर्यटकांना देणे बंधनकारक आहे. अन्यथा विमानतळावरच पर्यटकांना तपासणी करावी लागेल. विशेष आरोग्य विमा येथे अनिवार्य आहे. दुबईत प्रवेश होताच लोकांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप डीएक्सबी डाऊनलोड करावे लागेल. यावर संपूर्ण तपशील द्यावा लागेल. हॉटेलमधील गेस्टने खोलीतून बाहेर पडल्यापासून २४ तास तासानंतर इतरांना चेक इन करता येईल.
कंबोडिया : ५०००० डॉलर्सचा आरोग्य विमा गरजेचा
भव्य मंदिर, रंगीबेरंगी कॅफे आणि जलमार्ग कंबोडियाने कोरोना कालावधीत पर्यटकांसाठी खुला केला आहे. परंतु कठोर अटींसह. येथे येणाºया पर्यटकांसाठी ५० हजार डॉलर्सचे आरोग्य विमा संरक्षण आवश्यक आहे. देशात प्रवेश करताच पर्यटकांना ३ हजार रुपये जमा करावे लागतील. हे रोख किंवा क्रेडिट कार्डद्वारे केले जाऊ शकते. यात १५०० डॉलरच्या अंत्यसंस्कार शुल्काचाही समावेश आहे, जेणेकरून एखाद्या पर्यटकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याचा अंत्यसंस्कार त्याच्या खचार्ने करता येईल.
श्रीलंका : आंतरराष्ट्रीय उड्डाणे आॅगस्टपासून सुरू होणार होती, परंतु सुमारे दोन आठवडयांसाठी वाढवण्यात आली आहे. येथे आगमनाच्या ७२ तासांपूर्वी कोविड -१९ निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे. आगमन झाल्यावर येथे एक चाचणी होईल. यानंतर चौथ्या दिवशीदेखील एक चाचणी होईल. जर आपल्याला दीर्घ कालावधीसाठी राहायचे असेल तर आपल्याला दहाव्या दिवशी एक चाचणी घ्यावी लागेल.

सुनंदा घाडगे - प्रतिनिधी