सातारा जिल्हा समन्वय समितिवर डाँक्टर नितीन उत्तमराव सावंत यांचि निवड

सातारा जिल्हा समन्वय  समितिवर डाँक्टर नितीन उत्तमराव सावंत यांचि निवड

लोणंद प्रतिनिधी – 

सध्या सर्वत्र करोनाच्या महामारी ने हाहाकार माजलेला आहे . प्रशासनाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत . या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन चे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार लोणंद येथील नामांकित डॉ. नितीन उत्तमराव सावंत यांची निवड सातारा जिल्हा समन्वय समिती वर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्री शेखर सिंह यांनी डॉ. नितीन सावंत यांचे निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा प्रशासन बरोबर सहभागी होऊन विविध उपाय योजना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. या परिस्थितीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील विविध घटकांचा समन्वय साधण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडून डॉ. सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे .

डॉक्टर नितीन सावंत यांनी अग्रस्थानी राहून या महामारी मध्ये अनेक स्तुत्य उपक्रम राबवले आहेत. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे यांनी देखील त्यांच्या उपक्रमांबद्दल शाबासकी दिली होती. तसेच सुवर्णगाथा प्रतिष्ठान लोणंद येथील त्यांच्या सहकाऱ्यां बरोबर लोणंदवासियांच्या मदतीने परप्रांतीयांनासाठी अन्नछत्र राबविण्यात आले व याची दखल घेऊन माजी राज्यपाल सन्माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या हस्ते श्रीनिवास पाटील फाउंडेशन च्या वतीने साताऱ्याचे कोरोना हिरो म्हणून डॉ.नितीन सावंत यांना सन्मानित करण्यात आले होते.

या निवडीबद्दल त्यांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तसेच वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे