संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग

संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग

मुंबई - अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात किती चढउतार आले हे सर्वश्रुत आहे. त्याच्या आयुष्यावर चित्रपट निघावा असं त्याचं आयुष्य आहे. अनेक अडचणींचा सामना करुन संजय दत्त स्थिर झाला होता. त्यात आता एक दुख:द माहिती समोर आली आहे. संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होत असल्याने संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी संजय दत्तची कोरोना टेस्टही करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र तब्येत ठीक नसल्याचं सांगून संजय दत्तने आपल्या कामातून सुट्टी घेतली. त्यानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा कर्करोग पीडित असल्याने संजय दत्तला उपचारासाठी अमेरिकेला घेऊन जाण्याची शक्यता आहे.