सचिन पायलट यांना २४ जुलैपर्यंत न्यायालयाचा दिलासा; कारवाई न करण्याचे सभापतींना आदेश

सचिन पायलट यांना २४ जुलैपर्यंत न्यायालयाचा दिलासा; कारवाई न करण्याचे सभापतींना आदेश

राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे. सचिन पायलट यांच्या गटाला उच्च न्यायालयानं २४ जुलैपर्यंत दिलासा देत सभापती सी.पी.जोशी यांना कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे.
माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या गटानं विधानसभेचे सभापती सी.पी.जोशी यांनी बजावलेल्या नोटिसीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या प्रकरणी न्यायालयात पहिल्यांदा सुनावणी झाली. त्यानंतर आजपर्यंत सर्वांनी न्यायालयासमोर आपलं मत मांजलं. राजस्थान उच्च न्यायालयात मंगळवारी यावरील सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला असून २४ जुलैपर्यंत या आमदारांविरोधात कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही सभापतींना देण्यात आले आहेत.