शिवभोजन थाळीचा २३ लाख ३० हजार लोकांनी घेतला लाभ – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

शिवभोजन थाळीचा २३ लाख ३० हजार लोकांनी घेतला लाभ – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

मुंबई दि. २५ : राज्यात दि. १ जुलै ते दि. २४ जुलै पर्यंत ८७३ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २३ लाख ३० हजार ३१९ गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Maha Info Corona Website

राज्यात एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४०, जून महिन्यात ३० लाख ९६ हजार २३२, जुलै मध्ये आतापर्यंत २३ लाख ३० हजार ३१९
आणि असे एकूण दि. १ एप्रिल ते दि . २४ जुलै या कालावधीत १ कोटी १३ लाख ९ हजार ८४८ गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे.