वेब सीरीजमध्ये  इशान खट्टर दिसेल तब्बूसोबत बोल्ड सीन करताना

वेब सीरीजमध्ये  इशान खट्टर दिसेल तब्बूसोबत बोल्ड सीन करताना

मीरा नायर यांच्या वेब सीरीजमध्ये मान कपूरची भूमिका निभावणारा अभिनेता इशान खट्टर सध्या चांगलाच चर्चेत आहे. लेखक विक्रम सेठची कादंबरी 'अ सुटेबल बॉय'वर ही सीरिज आधारित आहे. यात तो सईदा बाई, म्हणजेच अभिनेत्री तब्बूसोबत बोल्ड सीन करताना दिसतोय. या सीनवरुन सध्या खूप चर्चा होतेय. 

सीरिजमध्ये इशान खट्टर एका नेत्याच्या मुलाची भूमिका साकारत आहे. इशाननं सांगितलं की, 'हे आजच्या काळातील एक नातं आहे. कथेत एक बोल्ड सीन आहे. मी साकारत असलेली व्यक्तिरेखा थोडी विचित्र आहे. तो जवळपास त्याच्यापेक्षा वयाने दुप्पट असणाऱ्या महिलेच्या प्रेमात आहे. पण हे एक फार सुंदर नातं आहे. ही मान कपूरची भूमिका माझ्या करिअरसाठी महत्वाची आहे.