विद्युत जामवालच्या 'नादी लागू नका!', 'या' यादीत पुतिन यांच्यासोबत जगात टॉप 10 मध्ये

विद्युत जामवालच्या 'नादी लागू नका!', 'या' यादीत पुतिन यांच्यासोबत जगात टॉप 10 मध्ये

 

मुंबई - बॉलिवूड अभिनेता  विद्युत जामवाल आपल्या रियल स्टंटसाठी प्रसिद्ध आहे. तो आपल्या ॲक्शनमुळं आणि स्टाईलमुळं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. यातच एक नवीन यश त्यानं मिळवलं आहे, त्यामुळं तो सध्या फार आनंदी आहे. विद्युत जामवालचं नाव जगातील त्या दहा लोकांच्या यादीत गेलंय ज्या लोकांच्या कुणी नादी लागू नये, असं सांगितलं जातं.

नुकतंच द रिचेस्ट नावाच्या एका पोर्टलने जगातील अशा दहा वॉरियर्सची लिस्ट घोषित केली आहे, ज्यांच्याशी कुणी पंगा घेऊ नये. या लिस्टमध्ये विद्युत जामवालनं आपलं स्थान पक्कं केलं आहे. या यादीत विद्युत सोबत रशियाचे राष्ट्रपति व्लादिमिर पुतिन आणि द मेन वर्सेज वाइल्डचे होस्ट बेअर ग्रिल्ससारखी नावं आहेत. या यादीत विद्युत एकमेव भारतीय आहे.

ही यादी घोषित होताच  विद्युतनं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये तो म्हणतो की, 'बेअर ग्रिल्सला पाहतो आणि फॉलोही करतो, आपले हे अद्वितीय साहस कौतुकास्पद असतं. अशक्य गोष्टी तुम्ही सहजपणे शक्य करुन दाखवता. तुम्हीच खरे ब्लू वॉरिअर आहात, ज्यांच्याशी कुणी पंगा घेऊ नये.'