वटवाघुळांमध्ये करोना विषाणू हा जवळपास ४० ते ७० वर्षांपासून असल्याचा दावा

वटवाघुळांमध्ये करोना विषाणू हा जवळपास ४० ते ७० वर्षांपासून असल्याचा दावा

 

वॉशिंग्टन - जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला असून संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. करोनाच्या विषाणूवर संशोधन सुरू आहे. करोना संदर्भात नवीन माहिती समोर येत आहे. करोनाच्या संसर्गाचा संबंध वटवाघुळांशी लावण्यात येत असून, त्याबाबतही संशोधन सुरू आहे. वटवाघुळांमध्ये करोना विषाणू हा जवळपास ४० ते ७० वर्षांपासून असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.

करोना विषाणू हा 'हॉर्सशू' या वटवाघुळाच्या प्रजातीत आढळला आहे. विशेष म्हणजे अनेक दशकांपासून तो या वटवाघळांमध्ये पसरत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नव्हती. संशोधकांनुसार, सध्या जो कोरोना व्हायरस सर्वत्र पसरत आहे, त्याचे मूळ विषाणू वटवाघुळांमध्ये ४० ते ७० वर्षांपासून अस्तित्वात आहेत. 

वटवाघुळांमध्ये इतरही विषाणू असू शकतात. यामुळे इतर संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. करोना पसरवणारा विषाणू हा वटवाघुळांमध्ये असलेल्या विषाणूशी मिळता जुळता आहे.