लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमीत्त सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमीत्त सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन

 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचा कार्यकाळ (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९) पर्यंत होता. मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते .
काल त्यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष श्री. किशोर शिंदे, भाजपा गटनेत्या आणि नगरसेविका सिद्धीताई पवार, बांधकाम विभागाचे प्रमुख श्री. भाऊसाहेब पाटील, अभियंता श्री सुधीर चव्हाण , श्री गणेश दुबळे व इतर मान्यवर उपस्थित होते .