रिलायन्स जिओ कंपनी घेऊन येत आहे खास ऑफर

रिलायन्स जिओ कंपनी  घेऊन येत आहे खास ऑफर

देशाची सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio)आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड प्लान घेऊन येते. आता कंपनीने आपल्या फीचर फोन ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहक १४१ रुपयांच्या प्रति महिना किंमतीवर रिलायन्स जिओचा फीचर फोन JioPhone 2 खरेदी करु शकतात. ही एक ईएमआय स्कीम आहे. याची सविस्तर माहिती कंपनीच्या वेबसाइटवर दिली आहे. जिओफोन २ फीचर फोनची खरी किंमत २९९९ रुपये आहे. परंतु, ईएमआय ऑफर अंतर्गत या फोनला १४१ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. वेबसाइटच्या माहितीनुसार, ही ऑफर केवळ क्रेडिट कार्ड युजर्संसाठी देण्यात आली आहे. ग्राहक या फोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाईट Jio.com वरून खरेदी करु शकतात. फोन खरेदीसाठी आपला पिनकोड टाकून फोनची उपलब्ध माहिती जाणून घेऊ शकता. या फोनचा डिलिव्हरी चार्ज ९९ रुपये आहे.