राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार

मुबंई - हजारो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत होऊ घातलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. भूमिपूजनाच्या या सोहळ्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. तर, महाराष्ट्रातल्या नेत्यांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला होता. भाजपच्या मुंबईतील कार्यालयात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भजन गायल्याचं दिसत आहे.

राम मंदिर भूमीपूजनाच्या निमित्तानं देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांनी भूमिपूजनाचा आनंद व्यक्त केला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या आंदोलनाच्या आठवणी जागवल्या आहे. मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी भजन गायलं आहे. तसंच, राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान आम्ही हेच भजन गात असू. आज पुन्हा त्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, असाही उल्लेख त्यांनी केला आहे.