राफेल विमानांमुळे भारतीय वायुदलाचं सामर्थ्य वाढलं आहे.

राफेल विमानांमुळे भारतीय वायुदलाचं सामर्थ्य वाढलं आहे.

अंबाला : फ्रान्सवरुन सुमारे 7000 किलोमीटर प्रवास करुन आलेल्या पाचही राफेल लढाऊ विमानांनी अंबाला एअरफोर्स स्टेशनमध्ये सुरक्षित लॅण्डिंग केलं आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानांनी अंबालामध्ये लॅण्डिंग केल्याची माहिती दिली. शिवाय राफेलच्या लॅण्डिंगचा व्हिडीओ देखील राजनाथ सिंह यांनी ट्वीट केलं आहे.

दरम्यान अंबाला एअरफोर्स स्टेशन परिसरात गर्दी होण्याच्या शक्यतेने हवाई दलाच्या विनंतीनंतर स्थानिक प्रशासनाने इथे कलम 144 (जमावबंदी) लावण्यात आलं आहे. याशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीवरही बंदी घालण्यात आली आहे.

राफेल विमानांना पक्ष्यांची उपमा देत लॅण्डिंगविषयी माहिती देताना राजनाथ सिंह यांनी लिहिलं आहे की, "पक्ष्यांनी अंबालामध्ये सुरक्षित लॅण्डिंग केलं आहे. राफेल विमानं भारतात दाखल होणं ही भारतीय सामर्थ्याच्या नव्या युगाची सुरुवात आहे. या विमानांनी भारतीय वायुदलाचं सामर्थ्य वाढलं आहे."