रणवीर सातासमुद्रापारही हिट ; सेलेना गोमझलाही टाकलं मागे

रणवीर सातासमुद्रापारही हिट ; सेलेना गोमझलाही टाकलं मागे

मीडियावरील फॉलोअर्स दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. अभिनयनाची अनोखी शैली आणि आपल्या हट के अंदाजामुळे त्यानं मोठ्या प्रमाणात तरुणांना आकर्षित केलं आहे.
रणवीर त्याच्या सिनेमांमुळे जेवढा जास्त चर्चेत असतो, त्याहूनही अधिक तो त्याच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलनं सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. देशात त्याचे जेवढे चाहते आहेत, त्याहूनही अधिक चाहते सातासमुद्रापार आहेत असं म्हणावं लागेल. रणवीरच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
सोशल मीडियावर अनेक असे प्लॅटफॉर्म आहेत, ज्यावर चाहते त्यांच्या आवडत्या कलाकाराला फॉलो करतात. रणवीर सिंह अमेरिकेच्या प्रसिद्ध आॅनलाइन डेटाबेस आणि सर्च इंजिन गिफी वर देखील आहे. याचा वापर अ‍ॅनिमेशन फोटो बनवण्यासाठी केला जातो. रणवीरने यावर १.१ अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. यामुळे रणवीरनं ९६१ दशलक्ष व्ह्यूज मिळवणाºया सेलेना गोमझलाही मागे टाकले आहे. त्यामुळे देशातच नाही तर सातासमुद्रापारही रणवीरचा जोरदार बोलबाला असल्याचं पाहायला मिळतं.