राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत १६ लाख ७० हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप – मत्री छगन भुजबळ

राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत १६ लाख ७० हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप – मत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 18 : राज्यात दि. 1 जुलै ते दि. 17 जुलै पर्यंत 870 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 16 लाख 70 हजार 840 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Maha Info Corona Website

राज्यात  गरीब व गरजूंना  एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 16 लाख 70 हजार 840 आणि असे एकूण  दि. 1 एप्रिल  ते  दि. 17 जुलै या कालावधीत 1 कोटी  6 लाख 50 हजार 369 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या  आहेत.