राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा - रोहीत पवार 

राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा - रोहीत पवार 

अभिनेते सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांनी केलेल्या मागणीचा वाद अजून संपलेला नसतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवी मागणी पुढे रेटली आहे. राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा, अशी मागणी रोहीत पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे. मंदिरं आणि धार्मिकस्थळं लोकांसाठी सुरू व्हावीत असं माझंही म्हणणं आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असं रोहित यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे पर्युषण पर्व काळात मंदिरं खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करून मंदिरं खुली करता येणार नसल्याचं म्हटलेलं असतानाच रोहीत पवार यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोहित यांच्या या मागणीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.