या वर्षाच्या अखेरिस भारताला करोनाची लस मिळणार

या वर्षाच्या अखेरिस भारताला करोनाची लस मिळणार

सध्या जगभरात आणि देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनावार नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे भारतात ही शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करून लस विकसित करत आहेत. दरम्यान, भारतातील करोना लसीची चाचणी सुरू असून, यादरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या अखेरिस भारताला आपली करोनाची लस मिळणार असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला आपली कंपनी करोनावरील लस लाँच करणार असल्याचं अदर पूनावाला म्हणाले. “पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनाच्या लसीची चाचणी सुरू करण्यात येणार आहे. ही चाचणी आयसीएमआरसोबत करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस आम्ही लसीचं उत्पादन सुरू करणार आहोत,” असंही पूनावाला म्हणाले.