यशराज बॅनर लॉंच करणार आमीर खानचा मुलगा जुनैदला

यशराज बॅनर लॉंच करणार आमीर खानचा मुलगा जुनैदला

आदित्य चोप्रा आता आपल्या नव्या सिनेमाची जुळवाजुळव करतोय. त्यासाठी त्याला नवा चेहरा हवा आहे. धूमच्या सीरीज पासून आमीर खान आणि आदित्य चोप्रामधले संबंध कमालीचे चांगले झाले. त्याचाच भाग म्हणून की काय, पण येत्या काळात आमीर खानच्या मुलाला यशराज बॅनर लॉंच करणार आहे. जुनैद हा आमीरच्या महिल्या पत्नीचा मुलगा. जुनैदला सिनेमाचं आकर्षण आहेच.

आमीर त्याच्यासोबत सिनेमाच्या चर्चाही करत असतो. आता जुनैदने इंडस्ट्रीत येऊन अभिनयाची इनिंग खेळायची ठरवली आहे. या बाातमीबद्दल ना यशराज बॅनर काही बोलत आहे ना आमीरच्या गोटातून यावर स्पष्टीकरण दिलं जात आहे. अर्थात ही चर्चा खोडून कुणीच काढलेली नाही. जुनैदला लॉंच करतानाच त्याला सध्या अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जातं आहे. त्यानंतरच जुनैद चित्रिकरणाला सुरूवात करेल. जुनैदच्या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. या सिनेमाच्या कामाला लॉकडाऊन पूर्णपणे उठवल्यानंतर सुरूवात होणार आहे. त्या वेगाने चित्रपटाचं चित्रिकरण पुढ्च्या वर्षी सुरू होईल. आणि सिनेमाही पुढच्या वर्षीच्या उत्तरार्धात रिलीज होईल अशी चर्चा आहे.