यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये VIVO स्पॉन्सर नसणार

यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये VIVO स्पॉन्सर नसणार

मुंबई - चीनला आणखी झटका बसला आहे. यावर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये VIVO स्पॉन्सर नसणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या मीटिंगमध्ये चीनी स्पॉन्सर ठेवण्यावरुन चौफेर टीका होत होती. त्यामुळे VIVO स्पॉन्सरला विरोध होत होता. आता VIVO आयपीएलचा स्पॉन्सर नसणार अशी माहिती समोर आली आहे.

आयपीएल संचालक समितीने रविवारी टुर्नामेंटच्या प्रमुख स्पॉन्सर म्हणून चीनी कंपन्यासोबत राहण्याच्या निर्णय घेतला होता. भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. यामुळेच चीनी कंपन्याचा जोरदार विरोध सुरु आहे. 

आयपीएलच्या 13 व्या सीजनचं आयोजन 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. सध्या बीसीसीआय स्पॉन्सरचा शोध घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका भारतीय कंपनीसोबत बातचित सुरु आहे. या रेसमध्ये एक अमेरिकन कंपनीही आहे. भारत-चीनचे संबंध सुधारले तर 2021 पासून 2023 पर्यंत पुन्हा VIVO स्पॉन्सर होऊ शकतो.