यूएईमध्ये आयपीएलच्या आयोजनासाठी सरकारकडून मंजूरी

यूएईमध्ये आयपीएलच्या आयोजनासाठी सरकारकडून मंजूरी

भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) या वर्षीचे आयोजन कोरोना व्हायरसमुळे यूएईमध्ये करणार आहे. आता यूएईमधील आयपीएलच्या आयोजनासाठी सरकारकडून औपचारिक मंजूरी मिळाली आहे. लीगचे चेअरमन बृजेश पटेल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. आयपीएल यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान शारजाह, दुबई आणि आबुधाबीत खेळले जाणार आहे. पटेल यांनी सांगितले की, आम्हाला सरकारकडून लिखित स्वरूपात मंजूरी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड जेव्हा स्थानिक क्रिकेटचे आयोजन परदेशात करत असते, त्यावेळी गृह, परराष्ट्र आणि क्रिडा मंत्रालयाची परवानगी आवश्यकता असते.

बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर आता एमिरेट्स क्रिकेट बोर्डाला माहिती देण्यात आली आहे. आता आम्हाला लिखित मंजूरी मिळाल्याने संघांना सूचित करण्यात आले आहे. अनेक संघ 20 ऑगस्टला रवाना होतील. त्यांना जाण्याआधी 24 तासांच्या आत दोन आरटी-पीसीआर चाचण्या कराव्या लागतील. चीनी मोबाईल कंपनी व्हिवो आयपीएलला स्पॉन्सर करण्यापासून मागे हटल्यानंतर आता बीसीसीआय लीगसाठी नवीन स्पॉन्सर शोधत आहे.