महिला नारळ न फोडण्याचे कारण- माहीत नसेल तर जाणून घ्या या मागचे खरे कारण….

 महिला नारळ न फोडण्याचे कारण- माहीत नसेल तर जाणून घ्या या मागचे खरे कारण….

 नारळ हे केवळ फळ नाही तर एक बी आहे                                                                                                                                 नारळाचे महत्व हिंदू धर्मात जास्त आहे. पुजेपासुन ते उद्घाटन कार्यक्रमापर्यंत उपयोगात आणला जातो. त्याचबरोबर नारळ तब्येतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपुर्ण आहे. नारळ हे केवळ फळ नसून एक बी आहे. कारण की महिला एका बिजापासुनच मुलाला जन्म देतात. महिलासुद्धा बाळाला जन्म देतात, म्हणून लोक महिलांना नारळ फोडायला देत नाहीत, कारण नारळ हे सुद्धा एक बीज आहे, आणि महिला बिजाचे कधीही नुकसान होऊ देणार नाहीत.

नारळाच्या संबंधी आहे एक पौराणिक कथा:                                                                                                                                     असे मानले जाते की, नारळ हे भगवान विष्णुच्या मार्फत पृथ्वीवर पाठवले गेलेले एक फळ आहे. या फळावर माता लक्ष्मीचा हक्क असतो. म्हणून माता लक्ष्मी सोडून अन्य कोणीही महिलाना नारळ फोडू दिला जात नाही. अशीही एक गोष्ट समोर आली आहे की, माता लक्ष्मीसुद्धा एक महिला आहे. नारळावर जर त्यांचा हक्क आहे, तर कोणीही महिला अशा वस्तूला कसे फोडू शकते, जो माता लक्ष्मीला अर्पण केला जातो. नारळाच्या झाडाला म्हणतात “कल्पवृक्ष”. नारळात ब्रम्हा, विष्णु, आणि महेश या तीन देवतांचे वास्तव्य आहे. म्हणूनच नारळाच्या झाडाला “कल्पवृक्ष” म्हणतात. या तीन देवतांच्या वास्तव्यामुळे नारळापासून महिलांना दुर ठेवले जाते.

नारळाशिवाय केलेली पुजा ही अपूर्ण मानली जाते:                                                                                                                       जोपर्यंत पुजेत नारळाचा समावेश होत नाही, तोपर्यंत ती पुजा अपूर्ण मानली जाते. असे बघण्यात आले आहे की, लोक जेव्हा दर्शनासाठी मंदिरात जातात, तेव्हा नारळ जरूर घेऊन जातात. म्हणूनच जेव्हा घरात पुजा असते, तेव्हा नारळ जरूर ठेवला जातो. यामुळे घरात पैशाची कधीच कमतरता भासत नाही आणि घरात वाईट शक्तींची सावली पडत नाही.

प्रेग्नेंसीमध्ये नारळ पाणी कधी प्यावं?
महिलांना प्रेग्नेंसीच्या पहिल्या महिन्यातच सकाळी उठल्यानंतर साधारणतः आजारपण आल्यासारखं आणि थकवा जाणवतो. अशा वेळेस नारळ पाण्याचे सेवन करणं सर्वाधिक फायदेशीर ठरेल. म्हणजे दुपारी 12 वाजण्यापूर्वी नारळ पाण्याचं सेवन करावं. दुपारी 12 वाजेनंतर नारळ पाणी पिऊ नये. तिसऱ्या महिन्यात गर्भाच्या मेंदूचा विकास होण्यास सुरुवात होते. या काळात पोषकतत्त्वांचा शरीराला पुरवठा होण्याची सर्वाधिक आवश्यकता असते. नारळाच्या पाण्यातून आई आणि बाळ दोघांनाही पोषकत्त्व मिळतात.