महेंद्र सिंह धोनीने निवृत्तीची घोषणा केली त्याच्या काही मिनीटांतच सुरेश रैनानेही आपल्या निवृत्तीची घोषणा केली

महेंद्र सिंह धोनीने निवृत्तीची घोषणा केली त्याच्या काही मिनीटांतच सुरेश रैनानेही आपल्या निवृत्तीची घोषणा केली

नुकतच भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या काही मिनीटांतच सुरेश रैनानेही आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. रैनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन 'आपण धोनीसोबत या प्रवासात आहोत, जय हिंद' अशी पोस्ट केली. सुरेश रैनाने 30 जुलै 2005 ला श्रीलंकेविरुद्ध दांबुला वनडेमधून डेब्यू केला होता. रैनाने 18 टेस्टमध्ये 768 आणि 226 वनडेमध्ये 5615 धावा केल्या आहेत. तसेच, 78 टी-20 मध्ये 1605 रन्स केले. रैनाने टेस्टमध्ये 1 आणि वनडेमध्ये 5 शतके ठोकली आहेत. तसेच, टी-20 मध्येही रैनाच्या नावे एक शतक आहे. रैना धोनीच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. रैना सुरुवातीपासूनच आयपीएलमध्ये धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये चेन्नईमध्ये खेळत आला आहे.