‘मुळशी पॅटर्न’ चा हिंदी रिमेक ‘गन्स ऑफ नॉर्थ’

‘मुळशी पॅटर्न’ चा हिंदी रिमेक  ‘गन्स ऑफ नॉर्थ’

अभिनेता सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा यांच्या ‘गन्स ऑफ नॉर्थ’ चित्रपटाविषयी एक नवीन बातमी समोर आली. या सिनेमात सलमानची छोटी भूमिका असेल असे आतापर्यंत ऐकले होते, परंतु सूत्रांनुसार सलमान या संपूर्ण चित्रपटात काम करणार आहे. त्यामध्ये त्याची मोठी भूमिका असणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी सलमानकडे वेळ कमी होता त्यामुळे तो यात एक छोटी भूमिका करणार होता, मात्र आता या चित्रपटासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे, त्यामुळे तो मोठी भूमिका करणार आहे. हा चित्रपट मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ चा हिंदी रिमेक आहे. सूत्रानुसार, आयुष आणि सलमान यांच्यात जोरदार टक्कर होताना दिसणार आहे.