‘मेरे देश की धरती’ या चित्रपटातून देशप्रेमावर भाष्य

‘मेरे देश की धरती’ या चित्रपटातून देशप्रेमावर भाष्य

कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित मेरे देश की धरती या चित्रपटातून दोन तरुणांच्या देशप्रेमावर भाष्य केलं जाणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाउनच्या अटी काही प्रमाणात शिथील करण्यात येत आहेत. त्यामुळे आता कलाविश्वातील कामकाजाला पुन्हा गती मिळाली असून, अनेक मालिका, चित्रपट यांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही जीवनावर भाष्य करणारा मेरे देश की धरती हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील परिस्थितीवर भाष्य करण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण जीवनावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून दोन अभियंत्यांचं जीवन कसं बदलत जातं हे सांगण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रवासातून प्रेक्षकांना एक महत्त्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक फराज हैदर यांनी केला आहे, दरम्यान ‘पेट्रियोटिक ड्रामा’ या प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटात दिव्यांदू शर्मा, अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.