मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी वैभववाडीतून मुख्यमंत्र्यांना निवेदन

मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी वैभववाडीतून मुख्यमंत्र्यांना निवेदन

शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष व मराठा समन्वय समिती अध्यक्ष विनायकराव मेटे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना वैभववाडी तहसीलदार यांचे मार्फत सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम व अन्य मराठा बांधवांच्या प्रमूख उपस्थितीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
         महाराष्ट्र सरकार अस्तित्वात येऊन 8 ते 9 महिने झाले आहेत. मराठा समाजामध्ये आरक्षणाबाबत चिंता व काळजी वाढत आहे म्हणून आपण हे आरक्षण न्यायालयात टिकावे म्हणून जातीने लक्ष घालावे. मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष नाम. अशोकराव चव्हाण यांचे सोबत एक दोन वेळा व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या सभेमधून आम्ही ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे आपले लक्ष वेधून घेत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणासहित समाजाचे सर्व प्रश्न त्वरित मार्गी लावावेत. यावेळी सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम, नंदकुमार शिंदे, संभाजी रावराणे,प्रदीप रावराणे, प्रविण गायकवाड, गणेश पवार, दीपक चव्हाण, दीपक पवार, सुनिल मोहिते, राजेंद्र मोहिते, बाळकृष्ण परब, दीपक मोहिते, भास्कर मोहिते, सुधीर लोके, महेश लांजवळ, दत्तात्रय परब, जयेश पवार, प्रमोद पवार, सचिन पवार, प्रथमेश पवार