मुंबई - कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेची ट्रकला धडक, बॅरिकेट्स तोडून ट्रक गेला फरफटत

मुंबई - कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेची ट्रकला धडक, बॅरिकेट्स तोडून ट्रक गेला फरफटत

मुंबई - कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेची ट्रकला धडक, बॅरिकेट्स तोडून ट्रक गेला फरफटत
कांदिवली स्टेशनजवळ रेल्वे रुळावर ट्रक आल्याने जोराची धडक होऊन अपघात झाला. ट्रकची मागची बाजू रेल्वे मार्गावर आल्याने ही धडक झाली. या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. पश्चिम रेल्वेमार्गावर कांदिवली स्टेशनजवळ रेल्वे लाइनवर काम सुरु आहे. यासाठी ट्रकमधून आवश्यक ती मालवाहतूक केली जाते. दुपारी साडेबाराच्या सुमारास आलेल्या रेल्वेने या ट्रकला धडक दिली. ट्रकच्या मागच्या बाजूचं नुकसान झालंय शिवाय रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत गेला, दुभाजकाच्या बॅरिकेटस् तोडून ट्रक पुढे गेला.
या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. दरम्यान या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक त्या उपाय योजना केल्या. दरम्यान रेल्वे लाइनचं काम सुरु असताना, रेल्वे मार्गावर ट्रक आला कसा? यामध्ये कुणाचा हलगर्जीपणा आहे का? याबाबत तपास सुरु आहे.

सुनंदा घाडगे - प्रतिनिधी