मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपलं

मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपलं

मुंबई - मुंबई आणि उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपलं आहे. ठिकठिकाणी पाणी गुडघाभर पाणी साचलं असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, मदत व पुनर्वसन विभागाने ही माहिती दिली आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा मात्र सुरुच राहणार आहेत.

आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर दक्षिण कोकणात पुढील 48 तासात जोरदार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.