मुंबईत सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार

मुंबईत सर्व दुकाने  सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार

मुंबई - मुंबईत येत्या 5 ऑगस्टपासून सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. लॉकडाऊनमध्ये सम-विषम तत्त्वावर दुकाने सुरू होती. मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. मुंबई महापालिकेनं याबाबतचं परिपत्रक काढल आहे.

महत्वाचं म्हणजे मद्यविक्रीच्या दुकानांचाही यात समावेश आहे. मद्य घरपोच देता येण्याची सुविधाही देण्यात आलीय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केल्यास रवाईचा इशारा महापालिकेनं दिला आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधली दुकानंही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.