माण तालुक्यात युरिया खताचा तुटवडा की साठेबाजी लक्ष द्या अन्यथा हासुड मोर्चा- राजू मुळीक

माण तालुक्यात युरिया खताचा तुटवडा की साठेबाजी लक्ष द्या अन्यथा हासुड मोर्चा- राजू मुळीक
माण तालुक्यात युरिया खताचा तुटवडा की साठेबाजी लक्ष द्या अन्यथा हासुड मोर्चा- राजू मुळीक

सातारा
माण तालुक्यामध्ये युरिया खताचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. पिकांसाठी पोषक असणाऱ्या खताचा तुटवडा ऐन हंगामाच्या वेळी आलेला असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यामध्ये दुकानात युरिया उपलब्ध असून देखील शेतकऱ्यांना जाणूनबुजून ताटकळत ठेवलं जात आहे, यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पिके जोमात आलेली आहेत, त्यांना योग्य वेळी खत पुरवठा न झाल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो, पण दुकानदारांना याच काही एक घेणं देण नसल्याचं चित्र संपूर्ण माण तालुक्यात पाहायला मिळत आहे, गोरगरीब शेतकऱ्यांना मुद्दाम परत लावून आपल्या खासागितल्या लोकांना गुपचूप युरियाचा पुरवठा करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर अशा मग्रुरी करणाऱ्या दुकानदारांवर योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करून बळीराजाला न्याय द्यावा अन्यथा कृषी विभाग कार्यलयावरती हासुड मोर्चा काढला जाईल असा इशारा राजू मुळीक यांनी आज माण तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यलयाला निवेदनादुवावर दिला आहे.

यंदाच्या वर्षी वरुणराजाने हजेरी वेळेवर लावलेली असल्याने शेतकरी सुखावला मात्र युरिया खत वेळेवर मिळत नसल्याने दुखावला आहे. याकडे गांभीर्याने अधिकारी वर्गाने पाहण्याची गरज आहे. कारण सध्या वरुणराजाच्या योग्यवेळी आगमनामुळे बळीराजाची ची लगबघ सुरू झालेली असून अनेक लोकांनी आपल्या शेतामध्ये विविध पिके केलेली आहेत. शेतात खुरपणी करण्याचे काम चालू आहे. उभ्या पिकांना पोषक असणारा युरिया खताचा तुटवडा असल्याने शेतकरी मोठ्या संकटात आला आहे .

माण तालुक्यातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून असल्यामुळे पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी वणवण फिरत आहेत. मात्र, साधे खत देखील उपलब्ध होत नाही. यातच युरिया खताचा तुटवडा दाखवण्यात येऊन साठेबाजी केली जाते. तसेच 
तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करताना कधी दिसत नाहीत. कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी कृषी अधिकाऱ्याकडून कोणतीही उपाययोजना केल्या जात नाहीत. तरी  शेतकऱ्यासाठी लक्ष देण्यात यावे अन्यथा कृषी अधिकारी कार्यालय वरती हासुड मोर्चा काढणार असल्याचे राजू मुळीक यांनी माध्यम प्रतिनिधीनशी बोलताना सांगितले आहे.

 तसेच यावेळी निवेदन देखील देण्यात आले यावेळी ग्राहक प्रबोधन समितीतर्फे कृषी विभागा कार्यालय माण, तसेच पंचायत समिती कार्यलय दहिवडी यांना निवेदन दिले आहे. यावेळी ग्राहक प्रबोधन समिती तालुकाध्यक्ष राजू मुळीक, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे तालुका सचिव एकनाथ वाघमोडे, शंभूराज जाधव, पृथ्वीराज हिरवे, आदित्य जगदाळे उपस्थित होते.