लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा अन्यथा विज कंपनीला टाळे ठोकू:- राजू मुळीक

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा अन्यथा विज कंपनीला टाळे ठोकू:- राजू मुळीक

दहिवडी- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने वीजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. या अन्यायकारक वीज बीला बाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा महावीतरण विभागाला टाळे ठोकू असे निवेदन वीरभद्र कावडे, ग्राहक हित समितीचे अध्यक्ष राजू मुळीक, केंद्रीय मानव अधिकारी माण उपाध्यक्ष जयवंत मोरे यांनी प्रांत अधिकारी कार्यलय व महावितरण विभाग दहिवडी येथे दिले आहे.

माण खटाव दुष्काळी तालुक्यातील वाढीव बिले माफ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज फक्त निवेदन दिले आहे. जर विज बिले माफ केली नाही तर विज कंपनीचे कार्यालयअसा टाळे ठोकू असा इशाराही यावेळी मुळीक व मोरे यांनी दिला आहे. कोरोना काळात ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देण्यात आले आहेत. राज्यभरात वीजबिलांचा मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अनेक संघटना वीज बिलांच्या विरोधातील आंदोलन करत आहे. त्याच अनुषंगाने आज १३ जूलै रोजी राजू मुळीक, जयवंत मोरे, अजित दडस, अभिजित शिंदे यांनी निवेदन दिले आहे. दहा दिवसात या वरती कारवाई झाली नाहीतर आम्ही आपल्या कार्यलयाला टाळे ठोकून आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रांत अधिकारी अश्विनी जिरंगे यांना निवेदन देताना राजू मुळीक, जयवंत मोरे  व इतर