मणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारी एक नाही पाच महापुरुषांचे पुतळे उभारणार

मणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारी एक नाही पाच महापुरुषांचे पुतळे उभारणार

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर सुरू झालेल्या वादावर आज तेथील ग्रामस्थांनीच सांमजस्याने पडदा टाकला. मणगुत्ती, बुळशीनट्टी आणि बेडकोळी या तीनही गावातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन मणगुत्ती गावच्या प्रवेशद्वाराशेजारील जागेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, वाल्मिकी ऋषी व श्रीकृष्ण यांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजित ठिकाणी आज सर्व ग्रामस्थांनी मिळून आज भूमिपूजन केले. ग्रामस्थांनी भूमिपूजनानंतर वाद मिटल्याचे स्पष्ट केले आहे.