भारतात ६ नवीन मेड इन इंडिया टीव्ही लाँच

भारतात ६ नवीन मेड इन इंडिया टीव्ही लाँच

टीव्ही मेकर कंपनी Hisense ने भारतात ६ नवीन मेड इन इंडिया टीव्ही लाँच केले आहेत. याची किंमत ११ हजार ९९० रुपयांपासून ते ३३ हजार ९९० रुपयांपर्यत आहे. ग्राहकांना हे टीव्ही अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, TataCliq, आणि रिलायन्स डिजिटल वरून खरेदी करता येवू शकते. याची विक्री ६ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. या ६ अल्ट्रा एचडी आणि अँड्रॉयड टीव्ही शिवाय कंपनी तीन आणखी मॉडल घेऊन येण्याची शक्यता आहे. कंपनी ६ ते ९ ऑगस्ट दरम्यान आपल्या टीव्हीवर ५ वर्षाची वॉरंटी देत आहे.

कंपनीने Hisense A71F सीरीज अंतर्गत तीन ४के डिस्प्ले आणि Hisense A56E सीरीज अंतर्गत तीन फुल एचडी डिस्प्लेचे टीव्ही लाँच केले आहेत. ३२ इंचाच्या फुल एचडी टीव्हीची किंमत ११ हजार ९९० रुपये, ४० इंचाचा फुल एचडी डिस्प्लेच्या टीव्हीची किंमत १८ हजार ९९० रुपये आणि ४३ इंचाच्या मॉडलची किंमत २० हजार ९९० रुपये आहे. तर ४के सीरीजमध्ये ४३ इंचाच्या मॉडलची किंमत २४ हजार ९९० रुपये, ५० इंचाच्या मॉडलची किंमत २९ हजार ९९० रुपये आणि ५५ इंचाच्या मॉडलची किंमत ३३ हजार ९९० रुपये आहे.