भारतात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं चिनी कंपन्यांच्या मोबाइलच्या सुट्या भागाच्या आणि टीव्हीच्या आयातीला मंजुरीस विलंब

भारतात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं चिनी कंपन्यांच्या मोबाइलच्या सुट्या भागाच्या आणि टीव्हीच्या आयातीला मंजुरीस विलंब

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर दुसरीकडे भारताच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत त्यांचे ४० जवान ठार केले होते. त्यानंतर देशभरातून चीनविरोधातील रोष वाढत होता. तसंच चीनी मालावर बंदीची मागणीही जोर धरू लागली होती. त्यानंतर भारतानंही अनेक कठोर पावलं उचलत चीनला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भारतात ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं (BIS) गेल्या काही आठवड्यांमध्ये चिनी कंपन्यांच्या मोबाइलच्या सुट्या भागाच्या आणि टीव्हीच्या आयातीला मंजुरी देण्यास विलंब केला आहे. मोबाइलच्या सुट्या भागांच्या आणि टीव्हीच्या आयातीला मंजुरी मिळण्यास होत असलेल्या विलंबाचा फटका शाओमी आणि ओप्पोसारख्या कंपन्यांना बसला असून नुकसानही सोसावं लागत आहे.