पहिल्यांदाच कोल्हापूरच्या इतिहासात एकाच वेळी तिघे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण

पहिल्यांदाच कोल्हापूरच्या इतिहासात एकाच वेळी तिघे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापुरमधील तिघांनी यश मिळवले आहे. यामध्ये दोन तरुणी व एक तरुणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे सौरभ व्हटकर यांनी घरीच अभ्यास करून हे यश मिळवलं आहे.

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या डॉ. प्रणोती संजय संकपाळ यांनी दुसऱ्या प्रयत्नात व कोल्हापुरमधील गौरी नितीन पुजारी यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. दोघींना पुण्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक वर्गाचा लाभ झाला. तर कोणत्याही मार्गदर्शक वर्गाला उपस्थित न राहता घरीच अभ्यास करून सौरभ विजयकुमार व्हटकर यांनी यश मिळवले आहे. कोल्हापूरच्या इतिहासात एकाच वेळी तिघांनी ही आव्हानात्मक परीक्षा उत्तीर्ण होण्याची पहिलीच वेळ आहे.