पैसे देऊन लाइक्स मिळवणाऱ्या रॅपर आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया उर्फ बादशहाचीही चौकशी करण्यात आली

पैसे देऊन लाइक्स मिळवणाऱ्या रॅपर आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया उर्फ बादशहाचीही चौकशी करण्यात आली

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस सोशल मीडियावरील फेक फॉलोवर्स आणि पैसे देऊन लाइक्स मिळवणाऱ्या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी रॅपर आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया उर्फ बादशहाचीही चौकशी करण्यात आली. आता बादशहाने सोशल मीडियावर ७२ लाख रुपये देऊन व्ह्यूज आणि लाइक्स वाढवल्याची कबुली दिली. यावर अजून बादशहाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुंबई पोलिसांच्या क्राइम इन्टेलिजन्ट यूनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बादशहाने सोशल मीडियावर ७.२ कोटी व्ह्यूज मिळवण्यासाठी ७२ लाख रुपये दिले होते. बादशहाच्या 'पागल है' या गाण्याला व्ह्यूज मिळावे म्हणून त्याने हे पैसे मोजले होते. गेल्या वर्षी बादशहाने दावा केला होता की त्याच्या गाण्याला २४ तासांच्या आत ७.५ कोटी व्ह्यूज आले आहेत. मात्र गूगल आणि यूट्यूबच्या अल्फाबेट कंपनीने त्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचं सांगितलं होतं.