पुन्हा पाघळला सोनू सूद, बेघर माय- लेकरांना बांधून देणार घर

पुन्हा पाघळला सोनू सूद, बेघर माय- लेकरांना बांधून देणार घर

लॉकडाउन सुरू झाल्यापासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने स्थलांतरीत मजुरांसाठी जेवढं केलं तेवढं सिनेसृष्टीतील इतर कोणत्याही कलाकाराने केलं नसेल. घरी पायी जाणाºया मजुरांचं दु:ख पाहून सोनूने हजारो लोकांना त्यांच्या घरी सुखरुप सोडलं आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊनही सोनू अनेक गरजूंची मदत करत आहे. नुकताच सोशल मीडियावर मिळालेल्या एका मेसेजनंतर सोनूने पटणातील बेघर कुटुंबाला घर बनवून देण्याचा निर्णय घेतला.
एका सोशल मीडिया यूझरने सोनूला पटणातील एक फोटो शेअर करत म्हटले की, ह्यसर, या महिलेच्या पतीचं निधन झालंय. घर मालकानेही त्यांना घराबाहेर काढलंय. एक महिन्यापासून ही महिला रस्त्यावर राहत आहे आणि तिची दोन लहान मुलं भुकेने व्याकूळ आहेत. कृपया मदत करा. सरकारकडून तर काही अपेक्षा नाही. यानंतर सोनूने या ट्वीटला उत्तर देताना लिहिले की, ‘उद्या या कुटुंबाच्या डोक्यावर हक्काचं छत असेल. या लहान मुलांसाठी एक घर नक्की होईल.’ सोनूच्या या ट्वीटचं लोक भरभरून कौतुक करत आहेत.
सोनूने लॉकडाउनमध्ये केरळवरून काही स्थलांतरीत मजूरांना एअरलिफ्ट केलं होतं. याच मजुरांपैकी उडीसा येथील राहणाºया एकाने त्याच्या दुकानाचं नाव सोनू सूदच्या नावावर ठेवलं आहे. ‘सोनू सूद वेल्डिंग वर्कशॉप’ असं त्याने दुकानाचं नाव ठेवलं. सध्या या दुकानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या लॉकडाउनच्या काळात स्थलांतरीत कामगार आणि गरिबांच्या मदतीसाठी सोनू नेहमीच अग्रणी राहिला आहे. याच अनुभवावर तो आता एक पुस्तकही लिहिणार आहे. सध्या या पुस्तकाचं नाव निश्चित झालं नसून वर्षाअखेरीसपर्यंत पुस्तक प्रदर्शित होणार असल्याचं त्याने सांगितलं.
दरम्यान, सोनूने महाराष्ट्र पोलिसांना २५ हजार फेस शील्ड डोनेट केले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर सोनूसोबतचा फोटो शेअर करत त्याचे आभारही मानले. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘आमच्या पोलीस कर्मचा‍ºयांना २५ हजार फेस शिल्ड देऊन केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मी सोनू सूद यांचे आभार मानतो.’

सुनंदा घाडगे - प्रतिनिधी