पाकिस्तानी क्रिकेटपटूने उधळली धोनीवर स्तुतीसुमने

पाकिस्तानी क्रिकेटपटूने उधळली धोनीवर स्तुतीसुमने

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या संपूर्ण स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीचा संथ खेळ हा मुद्दा कायम चर्चेत राहिला. त्यामुळे विश्वचषकानंतर निवड समितीने पहिल्यांदा मोठं पाऊल उचलत धोनीला विश्रांती दिली आणि ऋषभ पंतला संधी दिली. पंतला मिळालेल्या संधीचा लाभ उठवता आला नसल्यामुळे धोनीचे चाहते त्याला भारतीय संघात पुन्हा एकदा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे धोनीच्या निवृत्तीच्या चचार्ही सुरूच आहेत. अशातच पाकिस्तानचा खेळाडू कमरान अकमल याने धोनीवर स्तुतिसुमने उधळली आहेत.
‘धोनी हा भारताला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात प्रतिभावान यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. त्याने भारतासाठी अनेक विजेतेपदे मिळवली आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याची धावा करण्याची सरासरी ५०पेक्षा अधिक आहे. त्याच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आहे. पाकिस्तानात आमच्या तोंडचा घास पळवून न्यावा तशी त्याने क्रिकेट मालिका भारताला जिंकवून दिली होती. धोनीची प्रतिभा अविश्वसनीय आहे. महेंद्रसिंग धोनीच्या प्रतिभेबद्दल अधिक बोलायचं झालं तर वन डे विश्वचषक, टी २० विश्वचषक, IPL, चॅम्पियन्स ट्रॉफी... धोनीच्या नेतृत्वाखाली त्याच्या हाताखालील संघाने सर्व प्रकारच्या ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनी हा खरंच एक अप्रतिम खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये धोनीसारखे खेळाडू कमीच पाहायला मिळतात’, असे अकमल म्हणाला.
‘धोनी हा नशिबवान कर्णधार होता. २०११ च्या विश्वचषक संघाचे नेतृत्व करणं फारसं अवघड नव्हतं. कारण संघात सचिन, सेहवाग, मी, युवराज, युसूफ, विराट सगळेच प्रतिभावंत खेळाडू होते. गांगुलीने या साºयांना एकत्र घेऊन संघ घडवला आणि उभा केला. पण धोनीला मात्र ‘रेडीमेड’ संघ मिळाला’, असे मत माजी खेळाडू गौतम गंभीरने व्यक्त केले होते. त्यावर, ‘सौरव गांगुलीने देशाला अनेक मॅच-विनर खेळाडू दिले हे गंभीरचं म्हणणं योग्य आहे. पण धोनीकडे कर्णधारपद आल्यानंतर त्याचंही काम खूप कठीण होतं. (सारे अनुभवी आणि दिग्गज खेळाडू शांतपणे हाताळण्यासाठी) त्यावेळी धोनीसारख्या कर्णधाराचीच गरज होती. त्याने संघातील सर्व खेळाडूना नीट पद्धतीने हाताळले आणि संघ भक्कम केला’, असं मत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्त केलं.

सुनंदा घाडगे - प्रतिनिधी