नेहा महाजनने तिची कला सातासमुद्रापार नेली

नेहा महाजनने तिची कला सातासमुद्रापार नेली

एखाद्या कलेची मनोभावे सेवा केली तर ती कला तुम्हाला खऱ्या अर्थाने जगायला आणि तुम्हाला घडवायला मदत करते असं म्हणतात. आज याचाच प्रत्यय अभिनेत्री आणि सितार वादक नेहा महाजनला आला. पुण्यात सतारची गोडी लागलेल्या नेहाने आज हॉलिवूडपर्यंत गवसणी घातली आहे.

हॉलिवूड पॉपस्टार रिकी मार्टिनचा Pausa नावाचा ऑडिओ अल्बम नुकताच रिलीज झाला. खास लॉकडाउनमध्ये त्याने हा अल्बम रिलीज केला. यातील Mi Sangre या गाण्यात नेहाने रिकीला साथ दिली. या गाण्यात नेहाने सतार वादन केलं आहे. सध्या रिकी मार्टिनचा हा अल्बम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर स्वतः रिकीच्या टीमने नेहाला संपर्क करून या गाण्यासाठी विचारले होते. नेहा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती सतार वादनाचे अनेक कार्यक्रमही करते. इन्स्टाग्रामवर याच कार्यक्रमांचे काही व्हिडिओही तिने शेअर केले आहेत. हे व्हिडिओ पाहून रिकीच्या मॅनेजरने नेहाला संपर्क केला.