दीपिकानं प्रभाससोबत चित्रपटासाठी घेतलं 'इतकं' मानधन

दीपिकानं प्रभाससोबत चित्रपटासाठी घेतलं 'इतकं' मानधन

बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पडुकोण 'बाहुबली' प्रभाससोबत झळकणार असल्याची घोषणा यापूर्वीच झालीय. पण, या सिनेमासाठी दीपिकाच्या मानधनाचा हा आकडा ऐकला तर तुमच्याही भुवया उंचावतील. दीपिकानं या चित्रपटासाठी तब्बल वीस कोटी रूपये मानधन आकारलं असल्याची चर्चा आहे. इतकं तगडं मानधन आकारणारी दीपिका भारतीय सिनेसृष्टीतील पहिली अभिनेत्री आहे. दीपिकाच नव्हे, तर प्रभासनंही या आगामी सिनेमासाठी भलीमोठी रक्कम घेतल्याची चर्चा आहे. त्यानं तर थेट पन्नास कोटींवर झेप घेतलीय. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे दीपिकाचा तेलुगू सिनेसृष्टीमधला पदार्पणाचा चित्रपट असणार आहे.